मनुष्य नेहमीच त्याच्या जगाची व दुसऱ्याही जगांची गुपितें शोधण्याच्या प्रयत्नांत असतो. तो स्वतःला फार बुद्धिवंत व ज्ञानी समजत असतो. त्याला जें काही ज्ञान असते त्याच्या जोरावर त्याला असें वाटत असते कीं ज्या गोष्टींचा त्याने शोध लावलेला आहे व ज्या गोष्टींचा तो शोध लावण्याच्या प्रयत्नांत आहे, त्यांचा अर्थ तो बरोबर लावू शकतो. त्याला सर्व गोष्टी बरोबर समजतात असें त्याला त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून दिसते आणि म्हणून माणसाप्रमाणेच विचार करण्याच्या बाबतीत तो समाधानी असतो.
परंतु ज्या साधनांद्वारें तो सर्व गोष्टींचा शोध घेऊं पाहत असतो, तीं कमकुंवत असतात, व म्हणून त्याला वाटते त्याहून त्याला बरेंच कमी ज्ञान असते. या मर्यादांमुळे जगिक गोष्टींचा त्याचा समज व त्यांचा त्याने लावलेला अर्थ बऱ्याच अंशीं चुकीचा असतो; परंतु एवढेच नाही, तर त्याच्या उत्पन्नकर्त्याच्या स्वभावासंबंधीचे त्याचे निष्कर्षसुद्धा चुकीचे असतात.
देवासंबंधीची चुकीची मते मनांत राहू नयेत म्हणून माणसाने माणसाप्रमाणे विचार करण्याचे सोडून देणे आवश्यक आहे; त्याने देवाप्रमाणे विचार करण्यास शिकण्याची गरज आहे. जेव्हा देवाचा प्रकाश मनुष्याच्या ज्ञानप्राप्तिचा मूलाधार बनेल, तेव्हाच मग त्याला देव खरोखरीं कसा आहे यासंबंधीचे बरोबर ज्ञान होईल. 40p
.png)
