Marathi (मराठी)



गुलामगिरीतून स्वातंत्र्यात

गुलामगिरीतून स्वातंत्र्यात

कधी ना कधी प्रत्येक माणसाला स्वतःच्या दुर्दशेची जाणीव होतेच होते. आपला स्वतःचा स्वतःवर ताबा नाही ही गोष्ट तीव्रतेने त्याच्या लक्षांत येते. तो बंदिवान (कैदी) आहे, परिस्थितीने बांधलेला आहे, परंतु ही परिस्थिती नेमकी काय आहे हें तो सांगू शकत नाही.

“गुलामगिरीतून स्वातंत्र्यात” हें छोटे पुस्तक ह्या समस्येवर पवित्र शास्त्रातून (बायबलमधून) प्रकाश टाकते. ह्यांत दिलेले स्पष्टीकरण समजण्यास कठीण नाही, तत्वज्ञानाचे हें क्लिष्ट विवेचन नाही, तर व्यावहारिक भाषेत उपयुक्त होईल असें हें स्पष्टीकरण आहे. सर्वप्रथम, ही गुलामगिरी कसल्या प्रकारची गुलामगिरी आहे तें स्पष्ट केले आहे, व त्यानंतर या गुलामगिरीतून मुक्तता खरोखरीं कशी मिळते तें दाखवून दिले आहे.

ज्यांना स्वतःच्या आयुष्यात देवाच्या ज्वलंत सामर्थ्याचा – म्हणजेच प्रभू येशूच्या शुभवर्तमानाचा अनुभव आलेला आहे, त्यांना स्वानुभवाने माहीत आहे कीं त्यांच्या जीवनातून अंधकाराला घालवून दिले गेले आहे व त्यांच्याकरिता नूतन महान दिन उजाडला आहे. गुलामगिरीची व नैराश्याची जागा स्वातंत्र्याने (पापापासून स्वातंत्र्य) घेतली आहे, विश्वासी भक्ताचा ख्रिस्ताच्या लोकांमध्ये समावेश झाला आहे, आणि आता त्याला नव्याने सापडलेल्या त्याच्या उद्धारकाशी त्याचा रोजच्या रोज आनंदमय समागम होतो. ज्यांनी ही मुक्तता अनुभवली आहे, त्यांच्याकरिता त्या मुक्ततेच्या क्षणापासून जीवन पार बदलून गेले आहे. आता पूर्वीसारखी कोणतीच गोष्ट राहिलेली नाही, कारण कीं सर्व गोष्टी खरोखरींच नव्या झाल्या आहेत. 102p

डाउनलोड करा


PDF

मी माणसाप्रमाणे विचार करतो

मी माणसाप्रमाणे विचार करतो

मनुष्य नेहमीच त्याच्या जगाची व दुसऱ्याही जगांची गुपितें शोधण्याच्या प्रयत्नांत असतो. तो स्वतःला फार बुद्धिवंत व ज्ञानी समजत असतो. त्याला जें काही ज्ञान असते त्याच्या जोरावर त्याला असें वाटत असते कीं ज्या गोष्टींचा त्याने शोध लावलेला आहे व ज्या गोष्टींचा तो शोध लावण्याच्या प्रयत्नांत आहे, त्यांचा अर्थ तो बरोबर लावू शकतो. त्याला सर्व गोष्टी बरोबर समजतात असें त्याला त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनातून दिसते आणि म्हणून माणसाप्रमाणेच विचार करण्याच्या बाबतीत तो समाधानी असतो.

परंतु ज्या साधनांद्वारें तो सर्व गोष्टींचा शोध घेऊं पाहत असतो, तीं कमकुंवत असतात, व म्हणून त्याला वाटते त्याहून त्याला बरेंच कमी ज्ञान असते. या मर्यादांमुळे जगिक गोष्टींचा त्याचा समज व त्यांचा त्याने लावलेला अर्थ बऱ्याच अंशीं चुकीचा असतो; परंतु एवढेच नाही, तर त्याच्या उत्पन्नकर्त्याच्या स्वभावासंबंधीचे त्याचे निष्कर्षसुद्धा चुकीचे असतात.

देवासंबंधीची चुकीची मते मनांत राहू नयेत म्हणून माणसाने माणसाप्रमाणे विचार करण्याचे सोडून देणे आवश्यक आहे; त्याने देवाप्रमाणे विचार करण्यास शिकण्याची गरज आहे. जेव्हा देवाचा प्रकाश मनुष्याच्या ज्ञानप्राप्तिचा मूलाधार बनेल, तेव्हाच मग त्याला देव खरोखरीं कसा आहे यासंबंधीचे बरोबर ज्ञान होईल. 40p

डाउनलोड करा


PDF